चिखली : दरोड्याचा तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला चिखली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई वडाचा मळा चिखली येथे केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 2 लाख 66 हजारांचा ऐवज जप्त केला. अन्य एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. अटक आरोपींकडून दोन पल्सर मोटारसायकल, एक होंडा डियो, मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 66 हजारांचा ऐवज जप्त केला. या कारवाईमुळे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.