भुसावळ – पादचार्याला अडवत त्याच्या गळ्याला चाकू लावून एक हजार 200 रुपयांची लूट केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील तब्बल नऊ महिन्यांपासून पसार असलेल्या आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. शैलेंद्र अशोक (ऊर्फ) राजाराम नरवाडे (रा.नवीन सातारा, मामाजी टॉकीज रोड, बौध्द विहाराजवळ, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 30 मार्च रोजी ही घटना घडली होती. तक्रारदार अॅड.तुषार पद्माकर सूर्यवंशी हे पायी जात असताना आरोपीने शिवीगाळ व दमदाटी करीत रक्कम लांबवली होती. संशयीत आरोपी पाणी गेट परीसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली.
* यांनी केली कारवाई
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल व पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील थोरात, वाल्मीक सोनवणे, सुधीर विसपुते, कृष्णा देशमुख, उमाकांत पाटील आदींनी ही कारवाई केली. आरोपीच्या ताब्यातून चाकू जप्त व 500 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तपास एएसआय रफीक काझी करीत आहेत.