दरोड्याच्या तयारीतील तिघांना अटक

0
चाकण : म्हाळुंगे एमआयडीसी मधील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना चाकण पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे कटावणी, चाकू, मिरची पावडर असे साहित्य मिळाले. ही घटना शनिवारी (दि. 1) पहाटे तीनच्या सुमारास घडली. अक्षय रमेश जाधव (वय 21), संदीप बाळासाहेब खैरनार (वय 21, दोघे रा. निगडी), अर्णव राजाराम शिंदे (वय 30, रा. तळवडे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पप्रोल पंपावर होता प्लॅन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे एमआयडीसी परिसरात चाकण पोलीस शनिवारी रात्री गस्त घालत असताना एच पी पेट्रोल पपंजवळ तिघेजण संशयितरित्या आढळून आले. गस्तीवरील पोलिसांनी तिघांकडे विचारणा केली. त्यावेळी तिघेही पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे चाकू, मिरची पावडर, दोरी, कटावणी अशी घातक शस्त्रे मिळाली. मिळलेला सर्व ऐवज जप्त करून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता तिघेजण एच पी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. यावरून तिघांना अटक करण्यात आली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.