दरोड्याच्या प्रयत्नातील संशयितांना कोठडी

0

जळगाव। सुरत-भुसावळ पॅसेजरमध्ये 16 मार्च रोजी दरोड्यच्या तयारीत असणार्‍या शेख कादीर शेख इब्राहीम (वय 20), वसीम शेख अजीम शेख (वय 21) आणि चार अल्पवयीन संशयिताना शहर पोलिसांच्या पथकाने 16 मार्च रोजी अटक केली होती. त्यांच्याकडून मिरची पुड, दोरी, चाकू हस्तगत केले होते.

कादीर शेख आणि वसीम शेख यांच्या पोलिस कोठडीची मुदत रविवारी संपली. त्यांना न्यायाधीश गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.