दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा जणांना अटक

0

जळगाव । जीवनात एमआयडीसी परिसरातील विमानतळच्या जंगलात शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास दरोड्याच्या तयारीत असणार्‍या 6 संशयीताना एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून कोयते, चाकू आणि मिरचीपूड जप्त केली आहे. त्यांना शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी या सहा जणांना 6 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सर्व संशयित हे उत्तर प्रदेश येथील असल्याचेही समोर आले आहे.

संशयित बसले होते रस्त्याच्या कडेला लपून
विमानतळ परिरातील जंगलात काही संशयीत फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांना मिळाली होती. त्यावरून विजय डी. पाटील, भास्कर ठाकरे, शशिकांत पाटील, संदीप पाटील, निलेश भावसार, दादासाहेब वाघ यांच्य पथकासह चौकशीसाठी गेले. त्यावेळी विमानतळ परिसरात संशयीत तरूण रस्त्याच्या कडेला बसलेले दिसले. एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने त्यांना विचारपूस केली असता. त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी सर्व तरूणांची झडती घेतली. पोलिसांना कोयते, चाकू आणि मिरचीपुडचे पाकीटे सापडले. अंधाराचा फायदा घेऊन संशयितानी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना पकडून पोलिस ठाण्यात आणले.

या संशयितांना केली अटक
एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने पडकलेले सर्व तरूण उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांना चौकशी दरम्यात मिळली. संशयितांमध्ये अनिल कुमार नंद विश्वकर्मा (वय 34), अब्दुल मुस्तफा खान (वय 25), याकूब हनीफ शहा (वय 25), अन्वर पहेलवान जोगी (वय 25), मुस्तफा अब्दुल्ला खान (वय 22), शिवशंकर दयाराम विश्वकर्मा (वय 25) यांचा समावेश आहे. त्यांना अटक करून शनिवारी न्यायाधीश गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 6 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांवर उत्तर प्रदेशातही गुन्हे दाखल असण्याची शक्यता आहे.