भुसावळ। शहरात रात्रीच्या वेळेत नाकाबंदी दरम्यान दरोड्यााच्या तयारीत असलेली पाच टोळी पकडण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आल़े आरोपींच्या ताब्यातून गावठी कट्टा, तलवार तसेच पाईप, दोरी आदी दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार 9 रोजी मध्यरात्री 1 ते शनिवारी पहाटे 5 वाजेदरम्यान कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आल़े.
शहरातील जामनेर रोडवरील एका हॉटेलच्या आडोशाला काही संशयित असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकून आरोपींना अटक केली़ यामध्ये तस्लीम उर्फ काल्या शेख सलीम (रा़. दीनदयाल नगर), विष्णू परशुराम पथरोड (25, वाल्मीक नगर), जितु किसन गोडाले (26, वाल्मीक नगर), पवन मनोज ढंढोरे (21़, वाल्मीक नगर), शम्मी प्रल्हाद चावरीया यांना अटक करण्यात आली़ आरोपींविरुद्ध हवालदार राजेंद्र शिवसिंग तोडकर यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला़