भुसावळ । खामगाव पोलिसांच्या हातावर तूरी देऊन पसार झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीचा भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गुरुवारी बसस्थानकासह रेल्वे स्थानकावर कसून शोध घेतला मात्र आरोपी गवसला नाही.
रवी भीमराव गावरगुरू (बाळापूर फाईल, खामगाव) या संशयीत आरोपीस खामगाव पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केली होती मात्र गुरुवारी सकाळी तो पोलिसांच्या हातावर तुरी देत निसटला. नियंत्रण कक्षात त्याबाबत संदेश मिळाल्यानंतर सर्व पोलीस ठाण्यांना सूचित करण्यात आले.