जेजुरी । पूर्वीच्या आणि आजच्या पत्रकारितेत अमूलाग्र बदल झाले असून आजची पत्रकारिता म्हणावी तितकी सोपी राहिली नाही. असे असले तरीही दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारसरणीतील शीलवान, सुबुद्ध, समाजहित व सुजाण या चतुःसूत्रीचा पत्रकारांनी अंगीकार करणे गरजेचे आहे, असे मत जेष्ठ पत्रकार व नाट्यकर्मी सुरेश साखवळकर यांनी व्यक्त केले आहे.
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व कैवारी मराठा यांच्या वतीने पत्रकारिता पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कृषी परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. पत्रकार नितीन राऊत आणि जीवन कड यांना यावेळी पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आण्णासाहेब खाडे, खाजाभाई बागवान, तानाजी कोलते, रमेश लेंडे, प्रल्हाद गिरमे, अशोक साबळे, कैलास भोसले, शशिकला कोलते, शांताराम पोमण, संजय चव्हाण, डॉ. राजेश दळवी, अतुल पवार, कुंडलिक मेमाणे, वसंत ताकवले, बंडूकाका जगताप, बाळासाहेब मुळीक, रामदास जगताप, गौरव कोलते विकास कोलते यावेळी उपस्थित होते. दादा मुळीक, शांताराम कोलते, शहाजी पवार, राहुल जाधव, शाम पवार, नितीन यादव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रास्ताविक गौरव कोलते यांनी केले. सूत्रसंचालन सचिन धनवट यांनी तर, शिवाजी कोलते यांनी आभार मानले.
पत्रकारांचा सत्कार
आचार्य अत्रेंच्या भूमीत तयार होणार्या पत्रकारांनी हा समृद्ध वारसा सक्षमपणे पुढे चालवावा, असे विजय कोलते यांनी सांगितले. याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब बारटक्के, नि. रा. मेमाणे, शशिकांत भागवत, जिल्हा पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी सुनील लोणकर, तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दत्ता भोंगळे, उपाध्यक्षपदी बाळासाहेब कुलकर्णी यांच्या निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.