महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक, पहिले मराठी वृत्तपत्र दर्पणचे संपादक, पत्रकारितेचा दीपस्तंभ, युगप्रवर्तक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिन पत्रकार दिन म्हणून साजरा केला जाते. वयाच्या 20व्या वर्षी बाळशास्त्री जांभेकरांनी ब्रिटिश राजवटीमध्ये मराठी पत्रकारिता दर्पण या वृतपत्राच्या माध्यमातून उदयास आणली.भारतासह महाराष्ट्राच्या उज्जवल भविष्यासाठी त्यांनी स्वता:ला वाहून घेतले.
बाळशास्त्री यांचे मराठी, संस्कृत,बंगाली, गुजराती, कानडी, तेलगू, फारसी, फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल त्यांना फ्रान्सच्या राजाकडून मानसन्मान प्राप्त झाला होता.मुद्रित स्वरुपातील द्यानेश्वरी त्यांनी प्रथम वाचकांच्या हाती दिली.गणित व ज्योतिष यांतही ते पारंगत होते,1834साली एल्फिन्स्टन काँलेजात पहिले ऐतद्देशीय व्याख्याते म्हणून नियुक्ती झाली त्यावेळी आपला भारतदेश पारतंत्र्याने ग्रासलेला होता अनेक समस्यांच्या विळख्यात अडकलेला होता.अ निष्ट रुढीं, दारिद्य पाहून त्यांचे हृद्य भरून यायचे, त्यासाठी काहीतरी करावेच लागेल हे त्यांनी मनोमन ठरवले आणि समाजात जागृतीकरण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. समाजप्रबोधनासाठी वृत्तपत्र हे एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे हे त्यांना ठाऊक होते.त्यामुळे त्यांनी त्यांचे सहयोगी गोंविद कुंटे आणि भाऊ महाजनांच्या मदतीने, दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.6 जानेवारी इ.स.1832 रोजी दर्पण चा पहिला अंक प्रकाशित झाला. त्यावेळी जनसांमान्यासाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली. जांभेकरांचे विचार जनसांमान्याच्या मनात रुजले,आणि दर्पणला सामान्य जनतेचा प्रतिसाद मीळाला आणि दर्पणचे वर्गणीदार वाढतच गेले. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पणसोबतच त्यांनी दिग्दर्शन हे मराठीतले पहिले मासिक सुरू केले.
या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित केले, भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत, या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी पाच वर्ष काम पाहिले. त्याचप्रमाणे सार्वजनिक ग्रंथालयांचे महत्तव ओळखून बाँबे नेटिव्ह जनरल लायब्ररी या ग्रंथालयाची जांभेकरांनी स्थापना केली, एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते. दर्पणहे बाळशास्त्रीच्या हातातील एक लोकशिक्षणाचे माध्यम होते. याचा उपयोग त्यांनी समाजप्रबोधनासाठी केला. नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिदुस्थानचा इतिहास, बाळशास्त्री जांभेकर द्रष्टे समाजसुधारक होते.साधारपणे इ.स.1830ते इ.स.1846या काळात आपले योगदान महाराष्ट्राला व भारतसरकारला दिले. लोकशाहीमध्ये पत्रकारितेला चौथा आधारस्तंभ म्हणून संबोधले जाते, त्या द्रृष्टीने समाजाचा आरसा म्हणून पत्रकाराची भूमिका फार महत्त्वपूर्ण ठरते. हे बाळशास्त्री जाणून होते. त्याचप्रमाणे वृत्तपत्राचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळीचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिक करणाच्या प्रक्रियेला गती देतात, त्याचप्रमाणे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण याद्वारेच मीळते. वृत्तपत्राचा इतिहास हा जनतेचा,चळवळीचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गति देतात.
– रूपाली वैद्य
वागरे, नांदेड
9623009981