दर्यापुर ग्रामपंचायत सरपंच पदासाठी उद्या निवडणूक

0

11 ग्रामपंचायत सदस्य अज्ञात ठिकाणी सहलीवर रवाना

भुसावळ- तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील कोळी यांना अविश्वास ठरावामुळे पायउतार व्हावे लागल्याने त्यांच्या रीक्त झालेल्या सरपंचपदाच्या जागेवर नवीन सरपंचपदाची निवड शुक्रवारी होत आहे. यामुळे सरपंचपदावर विराजमान होण्यासाठी भावी सरपंचाने समयसुचकता बाळगत 11 ग्रामपंचायत सदस्यांना सहलीवर रवाना केले आहे. दर्यापूर ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील कोळी यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी अविश्वास ठराव पारीत झाला होता मात्र भुसावळ तहसील कार्यालयाकडून सरपंचपदाच्या निवडीची तारीख दिली जात नव्हती. यामुळे गत दोन महिन्यांपासून दर्यापूर येथील सरपंचपद रीक्त होते मात्र भुसावळ तहसीलदारपदाचा बाळासाहेब थोरात यांनी पदभार स्विकारताच दर्यापूर ग्रामपंचायत सरपंचपदाची निवड प्रक्रिया 21 सप्टेंबर रोजी करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर शुक्रवारी दर्यापुर ग्रामपंचायत सरपंचपदाची निवड प्रक्रिया सकाळी 11 वाजता राबवली जाणार आहे.

सरपंचपदी वंदना चौधरींची लागणार वर्णी ?
18 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीत असलेल्या वंदना सुधाकर चौधरी यांची भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. यामुळे सरपंचपदाची माळ त्याच्या गळ्यात पडणार असल्याची चर्चा आहे. अनेक दावेदारांना डावलून हे पद पुन्हा चौधरी घराण्याकडे जात असल्याने सदस्यांचे मत परीर्वतन होवू नये याची दक्षता घेवून 11 सदस्यांना सहलीवर रवाना करण्यात आले. यामध्ये सदस्या लक्ष्मी सपकाळे, वंदना चौधरी, आशा मघे, कुसूम गायकवाड, छाया तायडे, अनिता लोखंडे, सुनिता सोनवणे, सदस्य रामा खोंडे, गणेश गवळे, अजय चौधरी, बोद्धीसत्व अहिरे यांचा समावेश असल्याचे समजते .

नवीन सरपंचासमोरही विकास कामांची आव्हाने
तीन वर्षापासून सुनील कोळी सरपंचपदी विराजमान असतांना गावातील विकासकामे होत नव्हती तसेच ते सदस्यांना विश्वासात घेत नसल्याच्या आरोप करीत सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास पारीत करून त्यांना पायउतार केले मात्र दर्यापूर गाव व नवीन वसाहत या ठिकाणी रस्ते, गटारी, पथदिवे व मिलिंद नगरचे पूर्नवसनाचे मुद्दे ग्रामपंचायती समोर आहे. यामुळे दर्यापूरचा विकास होईल का ? अशी अपेक्षा सदस्य व गावकर्‍यांना आहे . यामूळे नवनिर्वाचीत सरपंच यांच्या अवघ्या दोन वर्षात विविध विकासकामांसह केंद्र शासनातंर्गत येत असलेल्या प्रभागात विकासकामांची आव्हाने आहेत.