दर्यापूरच्या माजी सैनिकाची आत्महत्या

0
वरणगाव:- दर्यापूर येथील रहिवासी व माजी सैनिक असलेल्या दीपक प्रकाश इंगळे (40) यांनी रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नैराश्यातून आत्महत्या केली. लष्करात असलेल्या दीपक यांना पाच वर्षांपासून सेवेतून कमी करण्यात आल्याने त्यांना पेन्शन वा पगार मिळत नसल्याने त्यांना नैराश्य आले होते. त्यांच्या पत्नी, मुलगा, आई, वडील असा परीवार आहे. दर्यापूरचे पोलीस पाटील गिरीश पाटील यांनी खबर दिल्यावरून वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.