दर्यापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदावर वंदना चौधरींची वर्णी

0

प्रतिस्पर्धी नितीन सोनवणे यांना अवघी चार मते : आता गावाची विकासाची अपेक्षा

भुसावळ- तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर वंदना चौधरींची वर्णी लागली. शुक्रवारी सकाळी 10 वाजता सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी दोन सदस्यांनी अर्ज दाखल केले. या निवडणुकीत 17 सदस्यांचे मतदान होते. यावेळी नितीन सोनवणे यांना चार मते मिळाली तर वंदना सुधाकर चौधरी यांना 11 मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

अविश्‍वास प्रस्तावानंतर झाली निवडणूक
दर्यापूर ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच सुनील कोळी मनमानी पध्दतीने ग्रामपंचायतीचा कारभार करीत असतांना सदस्यांना विश्वासात घेत नसल्याने ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी त्यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी अविश्वास ठराव पारीत केला होता . तेव्हापासून सरपंच पदाचे पद रीक्त होते. शुक्रवारी दर्यापूर ग्रामपंचायतीची सरपंचपदाची निवडणूक निर्णय अधिकारी आर.के.पवार यांच्या उपस्थितीत झाली. सकाळी 10 वाजता सरपंचपदासाठी नामांकन अर्ज वितरण करून दोन वाजेपर्यंत माघारीची वेळ देण्यात आली. सरपंचपदासाठी नितीन जिजाबराव सोनवणे यांना चार मते मिळाली तर वंदना सुधाकर चौधरी यांना 11 मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या तर या निवडणुकीत दोन सदस्य गैरहजर राहिले.

यांची होती उपस्थिती
निवडणूक प्रसंगी तलाठी दिलीप पवार, ग्रामसेवक आनंद सुरवाडे, कोतवाल वासुदेव सुरवाडे , पोलिस पाटील गिरीष पाटील यांनी सहकार्य केले. भाजपाचे सदस्य सुनी कोळी, जीवराम सुरवाडे, बोध्दीसत्व अहिरे, रामदास खोंडे, गणेश गावडे, अजय चौधरी, सदस्या आशा मेघे, छाया तायडे, कुसूम गायकवाड, अनिता पाटील, लक्ष्मी सपकाळे, अनिता लोखडे, सुनीता सोनवणे, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास पाटील, सुधाकर चौधरी, डॉ.विजय सुरवाडे, अरविंद पाटील यांची उपस्थिती होती. निवडणुकीसाठी वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील वाणी, दत्तात्रय कुळकर्णी, राहुल येवले, अतुल बोदडे, मनोहर पाटील, विकास गायकवाड, होमगार्ड रमेश इंगळे, शांतीलाल सोनार आदींनी चोख बंदोबस्त राखला.