भुसावळ- येथून जवळच असलेल्या वरणगाव फॅक्टरीलगत असलेल्या दर्यापूर शिवारातील सुशील नगरात जुगार खेळणार्यासात जुगारींच्या वरणगाव पोलिसांनी मुसक्या आवळत आठ हजार 360 रुपयांच्या रोकडसह जुगाराची साधने जप्त करण्यात आली. रवींद्र चिंधू गाढे (38 दर्यापूर शिवार), सतीश चंदू बर्हाटे (40, मिलिंद नगर), वसंत गुलाब कोळी (62, कोळीवाडा, वरणगाव), नरेंद्र गणपत बोदडे (38, मुक्ताईनगर), मिलिंद भीमराव सुरवाडे (38, तळवेल), संदीप मधुकर सुरवाडे (32, तळवेल), मधुकर काशीनाथ सुरवाडे (68, तळवेल) यांना अटक करण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सारीका कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हवालदार नागेंद्र तायडे करीत आहेत.