चाळीसगाव (अर्जुन परदेशी) । गंमतीने असे म्हटले जाते की वनविभाग नव्हता तेव्हा जंगल अधिक सुरक्षित होते. राज्यात वनविभागाच्या अनेक जाहिरातीतून जंगल वाचवा यासाठी कोट्यावधीचे बजेट खर्ची होते, मात्र कधीकाळी घनदाट दिसणारे पाटणादेवी जंगल आता बोडखे वाटू लागले आहे. शेकडो दुर्मिळ वनस्पतीचा ठेवा असलेल्या जंगलात ठिकठिकाणी आढळणारी चंदनाची झाडे हळूहळू नष्ट होत आहे. 6500 हेकटर जंगलातिल कण्हेर गडाच्या पायथ्याशी दुर्लक्षित जैन लेणीच्या जागेचा वापर चदनचोरांची गुहा म्हणून होत आहे. थोडीफार शिल्लक असलेली चंदनाच्या झाडांची कत्तल करून या लेणीत झाडातला गाभा काढला जात असून ही दुर्लक्षित जैन लेणी चंदन चोरांची गुहा ठरत असल्याचे गंभिर चित्र समोर आले आहे.
कुठे आहे दुर्लक्षित जैन लेणी ?
पाटणादेवी जंगलात मोठी वनसंपदा असल्याचे असल्याचे सांगितले जाते त्यात भरीसभर शेकडो दुर्मिळ वनस्पती येथे आढळते जंगलाच्या परिघात अनेक ऐतिहासिक वारसा जपणारी ठिकाणे आहेत यात पाटणादेवी आनंदा माता मंदिर ,धवलतीर्थ धबधबा , मद्रासी बाबा ,केदार कुंड , पितळखोरा लेणी ,भास्कराचार्य वनौषधींची संशोधन केंद्र, हेमाडपंथी महादेव मंदिर ,गायमुख झरा, नागार्जुन चावडी , सितान्हाणी अश्या ठिकाणा सोबत कण्हेर गडाचा समावेश होतो या गडाकडे जाताना दोन ठिकाणी पाण्याचे टाके लागतात तसेच दुर्लक्षित जैन लेणी आहे या जैन लेणी मध्ये सहा खांबावर कोरलेले गुहेत आहे लेणी अतिशय उंचावर आहे कधीकाळी येथे जाण्यासाठी पायर्या असल्याच्या खुणा स्पष्ट दिसतात सध्या या ठिकाणी जातांना काठीचा आधार असल्याशिवाय या निर्जनस्थळीचढून जाणे शक्य होत नाही याचाच फायदा चंदन चोरांकडून घेतला जातो आहे हे वास्तव समोर आले आहे
पाटणा जंगलातील चंदन नामशेष होण्याच्या मार्गावर
गौताळा अभयारण्य क्षेत्रात चंदन चोरांच्या घटना घडल्याच्या अनेक घटना घडतात मात्र गेल्याचार महिन्यांपूर्वी एक महिला एक पुरुष असे दोघा चंदन चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र गुन्हाच्या प्रमाणात अधिक चंदनचोरी होत असल्याचे या परिसर ला लागून असलेल्या ग्रामीण भागातील शेतकरी सांगतात चंदन चोरांच्या मोटरसायकलची रचना वेगळ्या पद्धतीची असते दोन्ही बाजूला मोठी पेटी ( डीक्की) लावलेली असते, त्यामध्ये हा लाखो रुपये किंमतीचा गाभा इच्छित स्थळी वाहून नेला जातो या चंदन चोरीची पद्धत देखील अभिनव असल्याने निर्जन स्थळांची आवश्यकता असते नेमका याचा फायदा घेत या दुर्लक्षित जैन लेणीचा वापर चंदन चोरांकडून होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन खात्री केली असता अतिशय धक्कादायक चित्र नजरेस पडले असून या लेणीत नुकतेच चंदनाच्या झाडातला सुवासिक व मौल्यवान गाभा काढून उरलेली बैलगाडी भर झाडाची साल याठिकाणी आढळून आली आहे .चंदनाचे झाड तोडून त्यांची एक एक फुटाचा तुकडा करवतीने कापला जातो त्यामध्ये दडलेला गाभा किती आहे हे बघण्यासाठी ग्रीमिट च्या (आटे असलेले धारदार शत्र) साहाय्याने झाडातील गर पाहिला जातो. त्यामुळे नुकतेच तोडलेली चंदनाची झाडांमधील गाभा काढून उरलेल्या साली पेटवून अथवा मातीत लपविली जातात ही वस्तुस्थिती आहे यामुळे वनविभागाला या ठिकाणी जाऊन दडलेली चंदनाची लाकडे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.
वनविभागाकडे अपुरे मनुष्यबळ
पाटणादेवी मंदिर हा परिसर गौताळा अभयारण्य क्षेत्रात येतो या आजूबाजूला मोठ्या डोंगर रांगा आहेत ही सातपुडा पर्वत रांग शेकडो किलोमीटर लांब आहे याचाच फायदा चंदन चोरांसाठी लाभदायी ठरतो आहे हा नैसर्गिक मार्ग अतिशय घनदाट असल्याने येथे चोरलेले चंदन या चोरांना पसार करण्यात अडचण येत नाही अशी माहिती येथे गुरे चारणार्या गुराख्याने दिली 6500 हेकटर जंगलात चार चार कंपार्टमेंट ची चार बिट आहेत या जंगलाच्या निगराणी साठी एक वनपरिक्षेत्र अधिकारी दोन वनपाल ,दोन वनरक्षक यांच्या सह पंधरा रोजंदारी कर्मचारी आहेत ही कर्मचारी संख्या म्हणजे ‘एक अनार सौ बिमार‘ अशी झाली आहे. हे अपुरे मनुष्यबळ देखील चंदन चोरी रोखण्यासाठी केले जाणार्या प्रयत्नात बाधा आणणारे आहे.
दररोज पेट्रोलिंग सुरू आहे!
पाटणादेवी जंगलात वन्यप्राण्यांची व वनौषधी संपदा आहे यात चंदनाची झाडे ही मोठ्या प्रमाणावर जंगलाच्या परिघात शिल्लक आहेत जंगलाच्या रक्षणासाठी मी स्वतः दररोज पेट्रोलिंग करीत असतो या शिवाय उपलब्ध मनुष्यबळाचं वापर करून जंगल राखले जाते, गेल्या चार महिन्यापूर्वी चंदन चोरांची घटना उघडकीस आली होती. त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव )एम बी पटवर्धन यांनी जनशक्तीशी बोलतांना दिली आहे