देहूरोड : मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या व्यापार्याचे अपहरण केले. ही घटना आज (सोमवारी) सकाळी सव्वासातच्या सुमारास देहूरोड येथील बाजारपेठेत घडली. ईश्वरचंद्र किसन अगरवाल (वय 52, रा. मेन बाजार, देहूरोड) असे अपहरण झालेल्या व्यापार्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वरचंद यांचे देहूरोड येथे गायत्री ट्रेडिंग नावाचे दुकान आणि रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. पैशांच्या देवाण घेवाणीवरून मागील काही दिवसांपासून त्यांचा नाशिक येथील एका व्यापार्यासोबत वाद सुरु होता. आज सकाळी सातच्या सुमारास ते घरासमोरील मंदिरात दर्शनासाठी गेले. त्यावेळी कारमधून आलेल्या चारजणांनी त्यांचे अपहरण केले. पोलीस घटनेची गांभीर्याने दखल घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून तपास करत आहेत.