दर मंगळवारी वेल्हाळा येथे ग्रामपंचायत समोर युवक ग्रामस्थ सकाळी दहा ते बारा भ्रष्ट ग्रामसेवक यांची चौकशी करून त्यांच्यांवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ “दर मंगळवारी धरणे आंदोलन ” करीत राहतील
आज दि.१२/९/२३ मंगळवार पासून विल्हाळे गांवचा ग्राम सेवक प्रशांत तायडे हा नियुक्त झाल्या पासून तर आज पर्यंत त्याच्या कामाची चौकशी व्हावी , त्याला बदली ठिकाणी त्वरीत सोडावे या मागणी साठी ग्रामस्थ युवकानी आज सकाळी दहा ते बारा ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन केले कोणीच वरिष्ठ अधिकारी न आल्याने गांवकऱ्याने निषेध करून सदर आंदोलन मांगण्या मान्य होईपर्यंत “दर मंगळवारी आंदोलन ” करत राहू असा गांवकरी यांनी निर्धार केला . पुढील मंगळवारी गणेश उत्सव असूनही आंदोलन तीव्र होणार आहे असे गांवकरी म्हणाले .
लोकसंघर्ष मोर्चाचे नेत्या यांनी जि.प. सी.ओ . यांना फोन करून चौकशीची मांगणी केली
आजच्या आंदोलना मध्ये आकाश कुरकुरे , रुपेश पाटील , चेतन पाटील , हेमंत पाटील , मिलीद पाटील , खेमचंद पाटील , नितीन सुरवाडे. लखन जाधव, विक्रम सुखाडे , दिनेश सुरवाडे , राजु राणे , संजय रुले , भूषण महाजन , नितीन पाटील ईत्यादी ग्रामस्थ युवक हजर होते
माजी सरपंच अशोक शिन्दे , लोकसंघर्ष मोर्चाचे जेष्ठ नेते सतीश पाटील. विविध कार्यकारी चे चेअरमन नागो ऊर्फ योगेश पाटील यांनी आंदोलनास जाहीर पाठीबा दिला आहे. पुढील मंगळवारी गणेशउत्सव सोबत ग्रामस्थ युवकांनी मोठ्या संख्येने हजर राहून भ्रष्टाचारां ला विरोध करावा असे आव्हान लोकसंघर्ष मोर्चा युवक चे तालुका अध्यक्ष आकाश कुरकुरे यांनी केले आहे