चाळीसगाव । येथील तहसिल कार्यालयाच्या आवारात खाजगी दलालांचा मोठा वावर वाढला असुन अधिकारी व दलाल यांचे आर्थिक साटेलोटे असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. जातप्रमाणपत्र काढण्याच्या नावाखाली उत्पनाचा दाखला काढुन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात
आर्थिक लुट केली जात आहे. तसेच खदाणीतुन दगड, माती, मुरुमाचे वारेमाप उत्खनन केले जात आहे.
राँयल्टी अगदी कमी भरुन उत्खनन अधिक केले जातात. करगाव शिवारातून सर्वाधिक उत्खनन केले जात आहे. अधिकारी व ठेकेदार संगणमताने सुरु असल्याचे आरोप करत लोकसंघर्ष मोर्चाचे तालुकाध्यक्ष अतुल गायकवाड, प्रसिध्दी प्रमुख सोमनाथ माळी, ज्ञानेश्वर राठोड यांनी तहसिलदार कैलास देवरे यांच्याकडे निवेदन दिले आहे.