दलित मुलाने मुस्लीम मुलीशी लग्न केले म्हणून मुलाच्या वडिलाला मिळाली ‘ही’ अजब शिक्षा

0

बुलंदशहर – शिक्षा म्हणून मारहाण किंवा शिवीगाळ केल्याचा प्रकार आजपर्यंत ऐकला असेल. मात्र, एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. मुस्लीम मुलीबरोबर लग्न केले म्हणून दलित मुलाच्या पित्याला थुंकी चाटण्याचे फर्मान पंचायतीने सुनावले.

बुलंदशहर जिल्ह्यातील एका गावातील पंचायतीच्या बैठकीदरम्यान ही घटना घडली. पीडित व्यक्तीने पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे, की पंचायतीच्या बैठकीत गाव सोडण्यास सांगितले. मुलीला व बायकोला नग्न होऊन चालायला सांगितले. माझ्या मुलाने मुस्लीम मुलीबरोबर लग्न केल्यानेच त्यांनी हा प्रकार केल्याचे पीडित व्यक्तीने म्हटले आहे. आपल्या मुलाने व मुस्लीम मुलीने रीतसर न्यायालयात नोंदणी करून विवाह केल्याचे पीडित व्यक्तीने सांगितले.

बुलंदशहरचे पोलीस अधीक्षक एस. पी. देहात म्हणाले की, आम्हाला याबाबत तक्रार मिळाली आहे. आम्ही जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करणार आहोत.