भुसावळ। महाराष्ट्र दलित साहित्य अकादमी च्यावतीने आंबेडकरी चळवळीचे दलित साहित्यिक कवी महिपतराव तायडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मराठी गीत, पोवाडे, कविता करणारे सहभाग घेवू शकतात. प्रथम क्रमांक पटकाविणार्या स्पर्धकास 1 हजार रुपये, द्वितीय क्रमांक पटकाविणार्या 500 रुपये देण्यात येतील.
स्पर्धकांनी आपल्या कविता 4 सप्टेंबरपर्यंत अनिल इंगळे, राहुल तायडे यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा निकाल 17 सप्टेंबरला होईल. तसेच विजयी उमेदवारांना धम्मचक्र प्रवर्तन दिनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अनिल इंगळे, सिध्दार्थ सोनवणे, राहुल तायडे, संजय तायडे, रमेश मकासरे, लक्ष्मण जाधव, लालाजी ढिवरे, दादा निकम, भगवान निरभवणे, रमेश सरकटे, अशोक सरवटकर परिश्रम घेत आहे.