धुळे। अॅट्रासिटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन त्यात शिक्षेची तरतूद वाढविण्यात यावी व चौकशीसाठी कोणतीही समिती गठीत करुन नये. यासाठी दलीत आदिवासी अॅट्रासिटी कायदा संरक्षण समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. धुळे जिल्ह्यातील अनुसूचित जातीचे आरक्षण पूर्ववत 13 टक्के करण्यात यावे.
अॅड.चंद्रशेखर आझाद यांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे, महामंडळाचे कर्ज माफ करावे, मागासवर्गीयांच्या अनुषेश भरण्यात यावा, एससी, एसटी, एनटी, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तातडीने द्यावी, वसतीगृहांचे रखडलेले अनुदान तातडीने मंजूर करुन द्यावे, विशेष घटक योजनेतून डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्र उभारण्यात यावे या मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले. याप्रसंगी एम.जी. धिवरे, वाल्मीक दामोदर, शशीकांत वाघ, हरिचंद्र लोंढे, शंकर खरात, किरण जोंधळे, संजय जवराज, बाबा शिरसाठ, श्रीकृष्ण बेडसे, भैय्या पारेराव यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.