दलीत वस्ती सुधार योजनेंतर्गत वर्षभरात 54 कोटींची कामे होणार

0

जळगाव ।अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करण्यातंर्गत अखर्चित मागील 18 कोटी शिल्लक आहेत तसेच 36 कोटींचा निधी शासनाकडून मिळणार असून एकुण 54 कोटी रकमेतून नवीन कामांना चालना मिळणार असल्याची माहिती, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करुन नवीन कामांसाठी आपल्या गावात योजनेतंर्गत वसतीमध्ये समाज मंदीर बांधणेबाबतचे ग्राम पंचायतीचे मागणी प्रस्ताव इस्टिमेट, मागील कामे पूर्णत्वाचा दाखला, नवीन समाजमंदीर बांधकाम करणे संदर्भात प्रस्ताव समाजकल्याण विभाग यांचेकडे तसेच तालुकास्तरीय गटविकास अधिकारी यांचे मार्पैत पाठवावे असे आवाहन जिल्ह्यातील 1151 ग्रापंना पत्र पाठवून सभापतींकडून करण्यात आले आहे. सदर कामे अडचणी आल्यास जि.प. समाज कल्याण विभागाकडे संपर्क साधावा.