जळगाव : शिक्षण क्षेत्राचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे, सर्वाना सीबीएसई अभ्यासक्रम लागु करणे, संविधानाचा अभ्यासक्रमात समावेश करणे, ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची ठोस पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, महापुरुषांच्या चरित्रांचा अभ्यासक्रमात सहभाग करण्यात यावा, यासह इतर मागणीसाठी भारतीय दलीत हक्क संघर्ष समिती प्रणित स्वाभिमानी भारत अभियानतर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले. संघटनेच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून सर्व स्तरातील व जाती धर्माच्या लोकांच्या जीवमानाचा अभ्यास करण्यात येत आहे. त्यात अनेक उणीवांचा व त्रुटींचा अभ्यास करण्यात आलेला आहे. म्हणून जनतेचे जीवनमान उंचविण्याकरीता संघटनेची मागणी मान्य करावी असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे. धर्मभुषण बागुल, प्रमोद इंगळे, विजय निकम, मधुकर सुरवाडे, गुरुदास भालेराव, फिरोज देशमुख, यमुनाबाई सोनवणे, शालुबाई भालेराव, किशोर डोंगरे, स्वप्निल जाधव, राजेंद्र सोनवणे आदीं जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.