लंडन । जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील भालाफेक स्पर्धेत भारताच्या दविंदरसिंग कांगने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला दविंदरसिंग पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे याच स्पर्धेत 20 वर्षाखालील गटातील विश्वविजेता नीरज चोप्राला मात्र सर्वोत्तम कामगिरी करूनही अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आले. दविंदरसिंगने पहिल्या प्रयत्नात 82.22 मीटर, दुसर्या प्रयत्नात 82.14 मीटर आणि तिसर्या प्रयत्नात 84.22 मीटर भालाफेक करत अंतिम फेरीत धडक मारली. या कामगिरीमुळे तो ब गटाच्या पात्रता फेरीत पाचव्या आणि सर्व स्पर्धकांमध्ये सातव्या स्थानावर राहिला. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी 26 वर्षीय दविंदरसिंगला शेवटच्या प्रयत्नात 83 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकण्याचे दडपण होते. पण, पंजाबच्या या युवा खेळाडूने 84 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भालाफेक करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. मे महिन्यात दिल्लीत झालेल्या इंडियन ग्रापी स्पर्धेत दविंदरसिंगच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे आताही तो खांद्याला बँडेज बांधून स्पर्धेत सहभागी झाला होता. दविंदरसिंगला जून महिन्यात मारिजुआना या अमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. मात्र, मरिजुआना हा आंतरराष्ट्रीय उत्तेजकद्रव्य विरोधी संघटनेच्या (वाडा) कक्षेत येत नसल्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे दविंदरसिंगचा स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
प्रशिक्षक नसल्याची नीरजला खंत
दुसर्या प्रयत्नात भालाफेक करताना काही तरी तांत्रिक चूक झाली याची जाणीव झाली. हा प्रयत्न तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आल्यावर त्यासंदर्भात चर्चा करातला माझ्यासोबत कोणीच नव्हते. मागील तीन चार महिन्यांपासून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे. त्यामुळे काही तांत्रिका बाबी समजावून घ्यायला वेळच मिळालेला नाही. आता तरी प्रशिक्षक मिळतील अशी अपेक्षा आहे. प्रशिक्षकांशी बोलून उणिवा दूर करता येतील. मागील स्पर्धेत नीरजने 82.26 अशी भालाफेक करत सहज अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरजला आता दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
दिल्यामुळे फारसे काही चांगले निष्पन्न होणार नाही. त्यासाठी कडक कायदे आणि नियमावली करण्याची गरज आहे. सट्टेबाजीला कायद्याच्या चौकटीत आणल्यावर आणखी काही प्रश्न उपस्थित होणार आहेत. याशिवाय कायदे आयोगाच्या पत्राला उत्तर देणे बंधनकारक नाही. त्यामुळे त्यांच्या पत्राला उत्तर द्यायचे की नाही हे ठरवावे लागेल.
नीरज अपयशी ठरला.
सोबत प्रशिक्षक नसल्याचा फटका नीरजला या स्पर्धेत बसला. पात्रता फेरीतील पहिल्या प्रयत्नात नीरजने 82.26 मीटर अशी फेक केली. नीरजची ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होती. दुसर्या प्रयत्नात तांत्रिक चूक झाल्यामुळे नीरजचा हा प्रयत्न रद्दबातल करण्यात आला. तीसर्या प्रयत्नात नीरजने 80.54 मीटर अशी भालाफेक केली.
पदक जिंकण्यासाठी प्रयत्न करणार
दविंदरसिंग म्हणाला की, नीरज अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नसल्याचे समजल्यावर तो प्रयत्न आपण करायचा. कुठल्या भारतीयाने केले नसेल ते देशासाठी करायचे होते. देवाच्या आशीर्वादामुळे त्यात यश मिळाले. मे महिन्यात झालेल्या इंडियन ग्रापी स्पर्धेत खांदा दुखावला होता. त्यामुळे शेवटच्या प्रयत्नाआधी श्रीलंकेचा माझा मित्र वारूना रंकोथला मी दुखर्या भागावर स्ट्रेचिंग करण्यास सांगितले. 12 ऑगस्टला अंतिम फेरीत देशासाठी पदक जिंकेल.