दशामातेचे भक्तीभावाने आगमन

0

नंदुरबार । दशा मातेचा जयघोष करीत डि.जे., बँडपथक, पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत शहरात मातेचे शनिवारी मोठ्या भक्तीभावाने आगमन झाल्यानंतर भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शहरासह परिसरात गेल्या दशकापासून दशामाता उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. गुजरातमधील हा मुख्य उत्सवांपैकीच एक आहे. आता लगतच्या महाराष्ट्र व मध्यप्रदेशातही तो साजरा होऊ लागला आहे.

दि 22 जुलै रोजी शनिवारी सकाळपासूनच भाविकांनी गणपती मंदिर , अहिल्याबाई विहीर परिसरात मातेची मूर्ती घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मूर्ती घेतल्यानंतर डि. जे. , बँडपथक, पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत भाविकांनी नृत्य, गरबा खेळत मिरवणूक काढली. यावेळी दशा मातेचा जयजयकार करण्यात आला. सायंकाळी उशिरा पर्यंत घरोघरी मातेची मूर्ती आणण्यासाठी लगबग दिसून आली. रविवारी पहाटे मातेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी
दशा मातेचा दहा दिवसांचा उत्सव असल्यामुळे अनेक भाविक भक्त उपवास करीत असतात. त्यामुळे बाजारात फराळ. फळ फळावर घेण्यासाठी महिलांची दिवसभर गर्दी होती. मंगल बाजार, तूप बाजार, सुभाष चौकात खरेदीसाठी झुंबळ उडाली. रविवारी पहाटे मातेची स्थापना धार्मिक मंगलमय वातावरणात घरोघरो करण्यात आल्यानंतर सायंकाळी आरती झाल्यानंतर रात्री महिलांचा गरबा नृत्य रंगणार आहे.