दसनुर गावालगत वाघ असल्याची अफवा

0
प्रत्यक्षात ठसे आढळले तडसाचे
रावेर : तालुक्यातील दसनुर येथील सुकी नदी पात्रात वाघ असल्याची माहिती काही नागरिकांनी पोलीस आणि वन विभागाला कळविली परंतु प्रत्यक्ष ठसे अवलोकन केले असता सदर ठसे तडस या वन्य जीवाचे असल्याची खात्री करण्यात आली या बाबतअधिक वृत्त असे की, दसनुर येथील काही शेतकऱ्यांनी काल  17 रोजी रात्री सुकी नदी परिसरात पट्टे असलेला प्राणी बघितल्याने तो वाघच असावा असा अंदाज घेऊन निंभोरा सपोनि श्री वानखेडे यांना माहिती दिल्याने त्यांनी वन विभागाला सूचित केल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी राजेन्द्र राणे, श्रीराम फाउंडेशनचे दीपक नगरे, वनपाल श्री धोबी, अतुल तायडे, हरिष थोरात यांच्यासह वन कर्मचारी यांनी तात्काळ भेट देऊन वन्य प्राण्याचे ठश्यांचे अवलोकन करून पाहणी केली असता सदर वन्यजीव हा तडस असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी पोलीस पाटील , दीपक चौधरी, उपसरपंच सुधाकर चौधरी, सचिल पाटील, विशाल पाटिल,विजय चौधरी, महेश चौधरी उपस्थित होते.