शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
पुणे । शेतकर्यांना कर्जमाफी देऊन तीन महिने झाले परंतु अद्याप शेतकर्यांना कर्जमाफी मिळाली नाही. याकडे लक्ष वेधत दसर्यापूर्वी शेतकर्यांची कर्जे माफ करा अशा मागणीचे नवेदन शिवसेनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकार्यांना दिले. यावळी शेतकर्यांची कर्जमुक्ती आणि सात-बारा कोरा झाला पाहिजे अशा घोषणा शिवसेनेने दिल्या.
शिवसेनेच्या वतिने शेतकर्यांना कर्जमुक्ती देण्यासाठीच्या आंदोलनाचा हा तिसरा टप्पा होता. कर्जमापीच्या घोषणे नंतर तीन महिने आकड्यांचा घोळ सुरू आहे.प्रत्यक्षात अजुन एकाही शेतकर्याला कर्जमाफी मिळाली नाही. त्यामुळे दसर्यापूर्वी शेतकर्यांना कर्जमुक्त करणार्याच्या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले. यावेळी मोर्चात राम गावडे, शाम देशपांडे, आशाताई बुचके, अमृता पठारे, शिसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बारामतीचे संपर्कप्रमुख सत्यवान उभे म्हणाले, सरकार कर्जमाफी देण्यासाठी वेळकाढुपणा करत आहे. तीन महिने झाले तरी एकाही शेतकर्याला कर्जमाफी मिळाली नाही. तर आमदार गौतम चाबुकस्वार म्हणाले, घोषनेपेक्षा सरकारणे कृती करून दसर्यापूर्वी सात-बारा कोरा करून शेतकर्यांना कर्जमुक्त करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू.