शहादा । येथील श्री शिव छत्रपती गृपच्यावतीने येत्या दसर्याला रावण दहनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या समितीच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत अग्रवाल तर सचिवपदी निलेश कापडणे यांची निवड करण्यात आली आहे. श्री शिव छत्रपती गृपचा वतीने गेल्या २१ वर्षापासून प्रेस मारुती मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम घेतला जातो. या कार्यक्रमासाठी दसर्याच्या निमित्ताने सीमोल्लंघन होते व हजारोचा संख्येने भाविक हा कार्यक्रम पहाण्यासाठी उपस्थित असतात. यावर्षी ३० सप्टेंबर रोजी साधारण ३५ फुट रावणाचे दहन होणार असल्याचे आयोजकानी सांगितले. यात विविध फटांक्याची आतिषबाजी होणार असल्याची माहिती मिळाली. रावण दहन कार्यक्रम समिती कार्याध्यक्ष विजय चौधरी, उपाध्यक्ष चंद्रभान कदम खजिनदार प्रशांत राजे , सदस्य संजय क्षिरसागर , दिपक शिंदे , श्रीधर चौधरी, भगवान बडगुजर आदि चा समावेश आहे.