पुणे : देशभरात 1 जुलैपासून जीएसटी करप्रणाली लागू करण्यात आली आहे. मात्र दस्त नोंदणीसाठी 1 टक्के दराने एलबीटी वसूल केला जात आहे. तो थांबवून 1 जुलैपासून वसूल केलेल्या एलबीटीची रक्कम संबंधितांना परत करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
एलबीटीची रक्कम पर करा
जीएसटी कायद्यानुसार देशातील सर्व कर रद्द करून एक कर पध्दती राबविण्यात येत आहे. जीएसटीमुळे एलबीटी रद्द झाला आहे. मात्र, अजूनही दुय्यम निबंधक यांच्याकडे दस्त नोंदणी करताना 1 टक्के एलबीटी वसूल केला जात आहे. या विरोधात संभाजी ब्रिगेडने मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारेख यांना निवेदन देऊन दस्तऐवजांची नोंदणी करताना एलबीटी वसूल करण्यात येऊ नये तसेच 1 जुलैपासून ज्या दस्तऐवजांमध्ये एलबीटी वसूल केला आहे तो संबंधित पक्षकारांना परत करावा, अशी मागणी केली आहे. या बैठकीस संभाजी ब्रिगेडचे पुणे शहर सरचिटणीस सिध्दार्थ कोंढाळकर, पुणे शहर उपाध्यक्ष ज्योतीबा नरावडे, पुणे शहर संघटक सुभाष जाधव आदी उपस्थीत होते.