दहशतवादविरोधात मुंबईत मूकमोर्चा

0

मुंबई । कतारकडून दहशतवादी संघटनांना होत असलेल्या अर्थपुरवठ्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी आझाद मैदान येथे एका मूकमोर्चाचे आयोजन मुंबईत केले गेले. या निषेध मोर्चामध्ये 500हूनही अनेक सामाजिक कल्याण आणि शैक्षणिक संघटना तसेच त्यांच्याशी संबंधित कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. अनेक फलकांवरील संदेशाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. यावेळी कतारने दहशतवादाला पाठबळ देणे आणि द्वेष पसरवणे थांबवावे, असे आवाहन करण्यात आले.

संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, बाहरीन आणि इजिप्त या देशांनी कतारविरोधात अनेक आरोप केल्यानंतर मध्य पूर्वेमधील परिस्थिती चिघळली आहे. कतार दहशतवादी संघटनांना अर्थपुरवठा करते. हा सर्वात मोठा आरोप कतारवर केला गेला. कतारने या बाबीचा तीव्र शब्दांमध्ये इन्कार केला असला तरी त्यानंतर या चार देशांनी कतारशी असलेले राजनैतिक संबंध तोडले आहेत.