श्रीनगर-जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा भागात सुरक्षा पथके आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. शोपियन जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्ती पथकावर हल्ला केला आहे. कुपवाडामध्ये दहशतवादी आणि सैन्यामध्ये चकमक सुरु आहे. जंगल भागामध्ये ही चकमक सुरु आहे.
Jammu & Kashmir: Terrorists lob grenade at an Army patrolling party in Shopian's Ahgam; 1 Army personnel injured, area cordoned off, search operation launched. pic.twitter.com/iIPk68xmue
— ANI (@ANI) June 29, 2018
शोपियनमध्ये लष्कराचे पथक गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे. पोलिसांनी सदर भाग रिकामी केला असून सर्च ऑपरेशन सुरु आहे. कुपवाडाच्या जंगल भागात दहशतवादी आणि जवानांमध्ये गुरुवार रात्रीपासूनच चकमक सुरु आहे. कुपवाडामध्ये दहशतवादी बऱ्याच काळापासून घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. सैन्याने याआधी घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावताना सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.