जयपुर । भारतात दहशतवादी कारावाया करण्यासाठी पाकिस्तानचे हरऐक प्रयत्न सुरु असतात. दहशतवाद्यांना पैसा कमी पडू नये म्हणून तो गोळा करण्यासाठी पाकिस्तानने नविन शक्कल लढवली आहे. आयएसआयचे हस्तक राजस्थान सिमेलगत असलेल्या दर्ग्यांमधील दानपेंट्यामध्ये जमा होणारे पैसे राजस्थानतील सीमेजवळ असणार्या गावांमध्ये दहशतवादी कारावाया करण्यासाठी देत असल्याचे कारस्थान राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेने उघडकीस आणले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थान पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान आयएसआयचा हस्तक दीना खान याने ही कबुली दिली आहे. दीना खाना म्हणाला की, राजस्थातील सिमेजवळील गावांमध्ये असेलेल्या दर्ग्यांच्या बाहेर आयएसआयने दानपेट्या लावल्या आहेत. दर्ग्यांमध्ये येणार्या भाविकांनी या दानपेटीत टाकलेल्या पैशांचा वापर राजस्थानमधील गावांमध्ये घातपातच्या कारावायांसाठी केला जातो. मागील आठवड्यात बाडमेर जिल्ह्यातील एका छोट्या गावतून पोलिसांनी दीना खानला अटक केली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान वाडमेर जिल्ह्यातील एका छोट्या गावात असलेल्या एक दर्ग्याचा प्रमुख असल्याचे कबुल केले. या दर्ग्यातील दानपेटीत जमा झालेले साडे तीन लाख रुपये आयएसआयचा हस्तक सतराम महेश्वरी, त्याचा पुतण्या विनोद महेश्वरी आणि हाजी खान यांच्याकडे दिले होते असे पोलिस अधिकार्यांनी सांगितले.
फितराचा वापरही दहशतवादासाठी
मुस्लीम समुदायात रमझानच्या काळात केलेल्या दानाला फितरा असे म्हणतात. रमजान महिन्यात फितरा गोळा करण्यासाठी आयएसआयने काही बेरोजगार मुस्लीम युवकांना आणि कुठल्यातरी दर्गा किंवा मशीदीशी संबधीत असलेल्या लोकांना कामाला लावले आहे. तीन दिवसांपूर्वी राजस्थान पोलिसांनी श्रीगंगानगर येथे फितरा गोळा करणार्या दोघा काश्मिरी युवकांना अटक केली आहे.
आयएसआयशी नियमीत संपर्कात
दीना खान हा पाकिस्तानातील आयएसआयच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या नियमीत संपर्कात असायचा. या अधिकार्यांनी दिलेल्या सूचनेनुसार दर्ग्यांमधील दानपेटीतील पैशांचा वापर करायचा. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या हाजी खानला यापूर्वी गोपनीय माहिती फोडल्याबद्दल अटक झाली होती. दीना खानने केलेल्या खुलाशामुळे सीमावर्ती गावांमधील अनेक दर्ग्यांमध्ये आयएसआयने दानपेट्या लावल्या असाव्यात असा पोलिसांना संशय आहे. हवाला मार्फत पैसे वाटले तर पकडले जाण्याची भिती असते. पण दानपेटीत पैसा टाकून त्याचे वाटप करणे खूपच सोपे असून त्यात अटक होण्याची शक्यता नसल्यामुळे सध्या या पर्यायाचा वापर केला जात आहे.
पाक विस्थापीत हाताशी
दीना खानच्या जोडीने राजस्थान पोलिसांनी धमेंद्र नावाच्या पाकिस्तानातील विस्थापिताला अटक करण्यात आली आहे. दीना खानच्या जोडीने धमेंद्रही भारतात आयएसएसचा हेर म्हणून वावरत होता. राजस्थानातील अनेक भागांमध्ये पाकविस्थापित नागरिक रहात असल्याचे धमेंद्रने पोलिसांना सांगितले. आयएसआयचे वरिष्ठ अधिकारी पाकिस्तानात रहात असलेल्या नातेवाईकांमार्फत पाक विस्थापितांवर हेरगिरी करण्यासाठी दबाब आणतात. त्याच्या दबावाला बळी पडून काही जण या कामासाठी तयार होतात. असे धमेंद्रने पोलिस चौकशीत सांगितले.