दहशतवादी कारवाया : पाक राजदूतावर आरोपपत्र

0

नवी दिल्ली – दक्षिण भारतात दहशतवादी कारवायांचा कट रचणार्‍या श्रीलंकेतील पाकिस्तानच्या राजदूताविरोधात राष्ट्रीय तपास पथकाने (एएनआय) गुरुवारी आरोपपत्र दाखल करण्याचा निर्णय घेतला. दहशतवादी कारवायांवरील खटल्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या पूनामाली या विशेष न्यायालय हे आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. 2013 मधील हे प्रकरण आहे. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान सरकारकडून या राजदूताला पुन्हा स्वदेशात बोलवण्याची शक्यता आहे. अमिर झुबैर सिद्दीकी असे कोलंबोत नियुक्तीवर असलेल्या पाकिस्तानी राजदूताचे नाव आहे. या राजदूताने श्रीलंकेतील पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयातून दक्षिण भारतात दहशतवादी करावाई घडवून आणल्याचा कट रचला होता. यासाठी सिद्दीकीने बनवलेल्या योजनेनुसार तामिळनाडूची राजधानी चेन्नईतील अमेरिकेचे वाणिज्य दुतावास, पूर्व नौदल कमांड, विशाखापट्टणम आणि बेंगळुरूमधील इस्रायली वाणिज्य दुतावास या ठिकाणांना हल्ल्यांसाठी टार्गेट करण्यात आले होते.