नवी दिल्ली । भारतात सध्या कुठल्या ना कुठल्या राज्यात दहशतवादी हल्ले घडत आहे. यामुळे भारताने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. ’दहशतवादी हल्ल्याचा सामना करणार्या ’टॉप’ देशांच्या यादीत भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे. इराक आणि अफगाणिस्ताननंतर भारतात सर्वाधिक दहशतवादी हल्ले होत आहेत’, असा दावा अमेरिकेतील यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या एका सर्वेत करण्यात आला आहे.
यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या कॉन्ट्रॅक्टवर काम करणार्या व दहशतवाद्यांसंदर्भातील आकड्यांचे विश्लेषण करणार्या छउडढठढ या संस्थेने हा दावा केला आहे. दहशतवादी हल्ल्याचा सामना करणार्या देशात इराक आणि अफगाणिस्ताननंतर भारताचा नंबर आहे.