दहशतवादी हल्ल्यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा

0

चार जवानही शहीद, तीन जवान जखमी

श्रीनगर : काश्मीरमधील पुलवामा जिल्हात रविवारी पहाटे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे चार जवान शहीद झाले असून, तीन जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले. पुलवामध्ये सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या तळामध्ये घुसून अंधाधूंद गोळीबार केला.

आणखी हल्ल्याची शक्यता
पुलवामातील अवंतीपोरा येथील या दहशतवादी हल्ल्याची सर्व जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे. तीन दहशतवाद्यांनी सीपीआरएफच्या तळावर प्रवेश करून अंदाधुंद गोळीबार केला. अशा प्रकारच्या आणखी एका हल्ल्याची शक्यता असल्याचे सीआरपीएफकडून सांगण्यात आले. दहशतवाद्यांनी ग्रेनेड डागल्याने त्यांना भारतीय जवानांनीदेखील चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला होता. दिवसभर शोधमोहीम राबविण्यात आली. या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.