दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद !

0

राजुरी: जम्मू-काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना झालेल्या चकमकीत महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद झाला आहे. जोतिबा चौगुले (वय ३६ रा. महागाव, ता.गडहिंग्लज, जि. कोल्‍हापूर) असे या शहीद जवानाचे नाव आहे. आज सोमवारी १६ रोजी राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पहाटे ३.०० वाजण्याच्या सुमारास जोतिबा चौगुले हे शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी १७ रोजी दुपारी महागाव येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.