लाहोर । मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार आणि कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईद पाकिस्तानमधील आगामी सार्वत्रिक निवडणूक लढवणार आहे. पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरू, असे हाफिज सईदने सांगितले. लाहोर उच्च न्यायालयाने हाफिजची नजरकैदेतून सुटका करण्याचे आदेश दिल्यानंतर हाफिजने याबद्दलचे संकेत दिले होते. कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, याबद्दल हाफिजने जाहिर केलेले नाही. हाफिज खरोखरच निवडणुकीला उभा राहिल्यास भारतासाठी ते एक आव्हान असणार आहे.। लाहोर वृत्तसंस्था।
‘मिलि मुस्लिम लिग‘ राजकीय पक्षाची घोषणा
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला नऊ वर्षे पूर्ण व्हायला दोन दिवस असताना पाकने हाफिज सईदची सुटका केली. त्यांच्या या निर्णयावर जगभरातून टीका होत आहे. हाफिज सईद याची कुख्यात दहशतवादी संघटना जमात-उद-दवाने यापूर्वीच सार्वत्रिक निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी मिलि मुस्लिम लिग या राजकीय पक्षाची घोषणा केली होती.