दहशतवाद्यांकडून लष्करांच्या वाहनावर आयईडी हल्ला

0

श्रीनगर-जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी लष्करावर हल्ला करण्याचे सत्र सुरु आहे. आज सकाळी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर आयईडी स्फोट केला. हा हल्ला पुलवामा येथील नौपारा परिसरात झाला.

दहशतवाद्यांनी स्फोटाच्या माध्यमातून लष्कराच्या वाहनाचे नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यात वाहनाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. स्फोटानंतर जवानांनी त्वरीत दहशतवाद्यांवर गोळीबार केला. यादरम्यान दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी आपल्या रणनीतीमध्ये बदल केला आहे. आता दहशतवादी सामान्य नागरिकांशिवाय सुरक्षा दलांवरही निशाणा साधत आहेत. काही दिवसांपूर्वी स्थानिक सुरक्षा दल आणि पेट्रोलिंग पार्टींवर हल्ले वाढले आहेत. २४ ऑगस्ट रोजी दहशतवाद्यांनी अनंतनाग येथे जवानांवर हल्ला केला होता. यादरम्यान जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. यात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला होता.