पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना आर्थिक आणि राजकीय मदत करणे थांबवले आहे की नाही याचा आढावा एक आंतरराष्ट्रीय गट घेणार घेणार असून त्यातूनही पाकचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत का? हे उघड होण्यास मदत होणार आहे. 36 विकसित देशांचा अंतर्भाव असलेली फायनॅन्शियल अॅक्शन टास्क फोर्स हा गट दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकची झाडाझडती घेणार आहे. पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना आर्थिक आणि राजकीय मदत करणं थांबवलं आहे की नाही याचा आढावा हा आंतरराष्ट्रीय गट घेणार आहे.
मुंबई हल्ल्यानंतर पाक आर्थिक ब्लॅक लिस्टमध्ये
फायनॅन्शियल अॅक्शन टास्क फोर्स या आंतरराष्ट्रीय गटाने 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानला एका आर्थिक ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले होते. त्यामुळे पाकिस्तानवर अनेक आर्थिक बंधनं आली होती. पण ही बंधन या फेब्रुवारी महिन्यात उठवली गेली होती. ही बंधनं उठवण्याची आर्जवं करताना पाकिस्तानने आम्ही दहशतवाद्यांवर कारवाई करू. त्यांची आर्थिक नाकेबंदी करू अशा अनेक थापा मारल्या होत्या. ही बंधनं उठेपर्यंत पाकिस्तानने आपल्या पायघड्या सुरूच ठेवल्या होत्या पण ही बंधन उठल्याउठल्या पाकने आपले जुने रंग दाखवायला सुरूवात केल्याने एफएटीएफच्या पुढच्या बैठकीत पाकिस्तानच्या या खोडसाळपणावर चर्चा होणार असून पाकिस्तान काही हेराफेरी करत असेल तर पाकची रवानगी पुन्हा ब्लॅक लिस्टमध्ये होऊ शकते.