दहशतवाद संपावा असे पाकिस्तानलाही वाटते

0

अमृतसर (वृत्तसंस्था) – पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यातील संबंध खराब करण्याचा किंवा त्यात कोलदांडा घालण्याचा भारताचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र कामकाज सल्लागार सरताज अझिझ यांनी सांगितले. पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत आहे या अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांच्या वक्तव्याला त्यांनी फारसे महत्त्व देण्याचे टाळले व घनी यांनी भारताला चुचकारण्यासाठी तसे विधान केल्याचे सांगितले अफगाणिस्तानचे अध्यक्ष घनी यांनी केलेले विधान खेदकारक आहे व त्यात अफगाणिस्तानचे वैफल्यच दिसून येते, तेथील कायदा व सुव्यवस्था चांगली नसल्याने वैतागून त्यांनी हे विधान केले, असे अझिझ म्हणाले.

घनी यांचे हे वक्तव्य भारताला खूश करण्यासाठी होते, पण पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यातील संबंधात वितुष्ट आणण्याचे भारताचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. कारण आमचे संबंध हे धार्मिक व सांस्कृतिक पायावर आधारित आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानातील दहशतवाद संपावा असेच आम्हालाही वाटते, असे अझिझ यांनी मायदेशी परतल्यानंतर सांगितले. अफगाणिस्तानातील हार्ट ऑफ आशिया परिषदेला ते अमृतसर येथे उपस्थित होते.