शांघाय । दहशतवाद हा मानवतेचा शत्रू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन संमेलनात बोलताना म्हटले आहे. ‘दहशतवादाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे,’ असेदेखील पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न केल्याशिवाय दहशतवादाचे समूळ उच्चाटन होणे अशक्य असल्याचेदेखील त्यांनी म्हटले. ‘दहशतवादाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. कट्टरतावादाला लगाम घालण्यासाठी, दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना होणारा अर्थपुरवठा रोखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्वांच्या प्रयत्नांशिवाय दहशतवादाला आळा घालणे अशक्य आहे,’ असे पंतप्रधान मोदी यांनी शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन संमेलनाला संबोधित करताना म्हटले.
भारताला शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनमध्ये स्थान दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सदस्य देशांचे आभार मानले. ‘12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताला शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनमध्ये स्थान मिळाले आहे. भारताला शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचे सदस्यत्व मिळण्यासाठी पाठिंबा देणार्या सर्व देशांचा मी आभारी आहे,’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. यंदा शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनमध्ये भारत आणि पाकिस्तानला स्थान देण्यात आले. भारत आणि पाकिस्तानला शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचे सदस्यत्व देण्यात आल्याने यंदाच्या संमलेनाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफदेखील शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन संमलेनाला उपस्थित होते. भारताला शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचे सदस्यत्व मिळाल्याने नवाझ शरीफ यांनी भारताचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान शरीफ यांनी अस्तानातील ऑपेरा हाऊसमध्ये एकमेकांची भेट घेतली. कझाकस्तानमध्ये शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला चीन, कझाकस्तान, किरगिझस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तानचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.