जळगाव- तालुक्यात बिबट्याचा संचार कायम असून सोमवारी मध्यरात्री गाय व म्हशीचा फडशा पाडल्याची घटना घडली. दापोरा गावातील रहिवासी रवींद्र वसंत काळे यांच्या मालकीचे गुरे गावाशेजारील खळ्यात बांधली असतना बिबट्याने हल्ला चढवत म्हशीच्या पारडूला ठार केले तसेच दुसर्या एका वासरालाही जखमी केले. शिरसोली परीसरात नायगाव शिवारातील भागातील हरीशंकर पाटील यांच्या मालकीच्या गायीवर हल्ला करीत तिचाही बिबट्याने फडशा पाडला.