मुंबई : दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. यंदाची निकालाची टक्केवारी 99.95 टक्के आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर जिल्हाचा लागला आहे.
शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद सुरु झाली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीने परीक्षा अशा पद्धतीने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. विद्यार्थ्यांचे दहावीचे मूल्यांकन त्यांच्या अंतर्गत मूल्यमापन अधिक नववीचा वार्षिक परीक्षेचा निकाल या आधारे करण्यात आले आणि निकाल जाहीर करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांनी २०२१-२२ या वर्षीच्या परीक्षेसाठी श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केली होती, त्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही, असे मंडळाने कळवले आहे. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नसल्याने या विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहतील, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
दृष्टिक्षेपात निकाल –
परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी – १६ लाख ५८ हजार ६२४
एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी – ९९.९५ टक्के
विभागिय मंडळ निहाय निकाल
पुणे : ९९.६५
नागपूर :९९.८४
औरंगाबाद :९९.९६
मुंबई :९९.९६
कोल्हापूर :९९.९२
अमरावती :९९.९८
नाशिक : ९९.९६
लातूर :९९.९६
कोकण :१००
निकाल पुढील लिंकवर उपलब्ध –
http://result.mh-ssc.ac.in
www.mahahsscboard.in