पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी, मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या १०वी चा निकाल जाहीर झाला आहे. गेल्या वर्षापेक्षा यावर्षी निकालाचा टक्का घसरला आहे. या वर्षीचा निकाल ७७.१० टक्के लागला आहे. यात मुलींनी बाजी मारली असून, विद्यार्थ्यांना दुपारनंतर ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.