दहावीच्या निकालात खान्देशात धुळे अव्वल; जळगावचा निकाल ७६.९२ टक्के

0

जळगाव: आज महाराष्ट्र राज्य शाळांत परीक्षेतर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ७७.१० टक्के निकाल लागला आहे. त्यात नाशिक विभागाचा निकाल ७७.५८ टक्के लागला आहे. नाशिक विभागात धुळे जिल्हा प्रथमस्थानी आहे. धुळ्याचा निकाल ७७.११ टक्के लागला आहे. जळगाव जिल्ह्याचा निकाल ७६.९२ टक्के लागला आहे. जळगाव जिल्ह्यातील ११ हजार ५६० विद्यार्थी विशेष प्रविण्याने उत्तीर्ण झाले आहे. प्रथम श्रेणीत २० हजार ४६०, द्वितीय श्रेणीत १२ हजार ५९९ तर तृतीय श्रेणीत १६२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.