पुणे । राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (मंगळवारी) जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार असून कला विषयातील वाढीव गुणांबाबतच्या निर्णयामुळे यंदा निकालाला उशीर झाला होता. मंगळावारी 13 जूनरोजी दुपारी एक वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर दहावीचा निकाल बघता येणार आहे. सकाळी 11 वाजता पुण्यात पत्रकार परिषद होणार असून यात निकालाविषयीची माहिती दिली जाणार आहे.
यंदा दहावीची बोर्डाची परीक्षा 7 मार्च ते 29 मार्च 2017 या कालावधीत घेण्यात आली होती. यावेळी 17,66,098 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यातील 16,89,239 विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच परीक्षा दिली, तर बाकीचे दुसर्यांदा परीक्षेला बसले होते. एकूण विद्यार्थ्यांपैकी 9,89,908 विद्यार्थिनी होत्या तर 7,76,190 विद्यार्थी होते. राज्यभरातून 4,728 इतक्या केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.
निकाल कसा पाहता येणार ?
महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in यावर SSC Result 2017 क्लिक करा. तुमचा परीक्षा क्रमांक आणि अन्य माहिती रकान्यांमध्ये भरा आणि ‘सबमिट’वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला निकाल पाहता येईल किंवा डाऊनलोडही करता येईल.