जळगाव । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवार 8 जून रोजी दहावीचा निकाल घोषित करण्यात आला. खान्देशात 88.08 टक्क्यांसह जळगाव अव्वल राहिले. त्यापाठोपाठ धुळे 87.51 तर नंदुरबारचा 80.74 टक्के निकाल लागला. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात देखील मुलीच सरस राहिल्या. दहावीत विवेकानंद प्रतिष्ठान संचलित श्रीमती ब.गो. विद्यालयाची विशाखा सुरेश कुलकर्णी व आर. आर. विद्यालयाच्या वैष्णवी विजयकुमार दुसाने (दोघे 99.20 टक्के) यांनी प्रथम, नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयाची देवश्री हरेश्वर कोहे (99) हिने द्वितीय तर धरणगाव येथील पी.आर. विद्यालयाचे अनुष्का सपकाळे (98.20) हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे.
नाशिक विभाग परीक्षार्थी
नाशिक विभागातून दोन लाख 54 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यात एक लाख 11 हजार 655 विद्यार्थी तर 88 हजार 399 मुलींचा समावेश होता. त्यातील 95 हजार 81 मुले तर 79 हजार 811 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील 131 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा झाली. त्यात 35 हजार 105 मुलांनी तर 25 हजार 137 मुलींनी दहावी परीक्षा दिली. एकुण 60 हजार 242 विद्यार्थ्यांपैकी 53 हजार 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नाशिक विभागाचा निकाल 87.42 टक्के राहिला. रोझलॅन्ड इंग्लिश मिडीरम स्कूल, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीरम स्कूल भोईटे माध्रमिक विद्यालर, सेंट टेरेसा इंग्लिश मिडीरम, उज्ज्वल इंग्लिश स्कूल, रारसोनी इंग्लिश मिडीरम स्कूल, नगरपालिका माध्रमिक विद्यालर, आदर्श सिंधी हारस्कूल, रारसोनी मराठी माध्रमिक विद्यालर, माध्रमिक विद्यालर, अलफेज उर्दू हारस्कूल व विद्या इंग्लिश मिडीरम स्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे.
नंदिनीबाई मुलींचे विद्यालय
नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व क. महाविद्यालयाचा निकाल 98.34 टक्के लागला आहे. विद्यालयातील 310 विद्यार्थ्यांपैंकी 304 विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या. यात 26 विद्यार्थिंनी 90 टक्केेपेक्षा जास्त गुण मिळवून यशस्वी झालेल्या आहेत. देवश्री हरेश्वर कोल्हे ही 99 टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. मृणाली सुहास पाटील 97 टक्के गुण मिळवून द्वितीय तर प्राची धनंजय पवार व निलाक्षी विलास चौधरी ह्या दोघी 96.40 टक्के गुण मिळवून तृतीय आल्या आहेत. काजल पदमाकर पवार (96.20) मानसी पराग शार्दुल ही 95. 60 टक्के गुण प्राप्त केले आहे.
लुंकड कन्या शाळा
प.न.लुंकड कन्या शाळेचा निकाल 90.63 लागला असून 19 विद्यार्थ्यांना 90%च्या वर गुण मिळाले. आदिती विजय राणा ही 95.80 टक्के गुण मिळवून प्रथम आली. तर भूमिका राजेंद्र कानडे द्वितीय 95.60 टक्के, देवयानी भोसले 95.40 टक्के मिळवून तृतीय. निकीता पुुंडलिक कोळी (95.20), आकांक्षा राणा (94.20), पूजा तलवारे (94.20), शुभांगी ज्ञानेश्वर चौधरी (93.80), सृष्टी किरण मदाणे 93.40 टक्के, राशी राजेश पाटील, प्रेरणा मनोजकुमार ओझा यांना प्रत्येकी 93.20 टक्के मिळाले आहेत.
शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालय
शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयाचा निकाल 95.18 टक्के लागला असून 16 विद्यार्थ्यांनी शेकडा 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. हिमांशु विलास चांदेलकर यांस गणित विषयांत 100 पैंकी 100 गुण प्राप्त केले आहेत. तर हितेंद्र मनोज सरोदे हा 96.40 टक्के मिळवून विद्यालयात प्रथम आला आहे. विपीन तेजराव पाटील व्दितीय (94.80) , लोकेश संजय चिंचोले 94.20 टक्के मिळवून तृतीय आला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारणक मंडळाचे कार्याध्यक्ष अॅड. सुशिल अत्रे, सिचव अभिजीत देशपांडे, विश्वस्त प्रेमचंद ओसवाल तसेच सर्व सन्मानीय संचलाक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक दुर्गादास मोरे व शालेय पदाधिकारी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी अभिनंदन केले.
काशिबाई उखाजी कोल्हे धिरज महाजन प्रथम
शहरातील काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालयाचा निकाल 86.20 टक्के लागला आहे. एकूण 319 विद्यार्थ्यांपैकी 275 विद्यार्थी पास झाले आहेत. विद्यालयातून व मागसवर्गीयांतून निखील मधुकर महाजन हा 94.60 टक्के मिळवून प्रथम आला आहे. धिरज उमेश पाटील याने 94.40 टक्के गुणमिळवत व्दितीय तर अबोली सुनिल सरोदे ही 93.60 गुण मिळवून तृतीय आली आहे. यशस्वीतांचे मंडळाचे अध्यक्ष विजय पंडीतराव कोल्हे, संचालक तथा महापौ ललित कोल्हे, चिटणीस अवधूत गंगराम पाटील, उपचिटणीस सतिश दशरथ खडके, मुख्याध्यापिका सौ. जे. आर. गोसावी, उपमुख्यध्यापक ए.व्ही. ठोसर, पर्यवेक्षक श्रीमती बी.डी. अत्तरदे, एच. जी. काळेंसह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी अभिनंदन केले.
आर.आर.च्रा 223 विद्यार्थ्यांना डिस्टींक्शन
आर. आर. विद्यालयाचा निकाल हा 97.58 टक्के लागला. 497 विद्यार्थ्यांपैकी 485 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 223 विद्यार्थ्यांना डिस्टींक्शन मिळाले असून 191 विद्यार्थ्यांना फस्ट क्लास मिळाला आहे. वैष्णवी विजयकुमार दुसाने ही 99.20 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे. तेजस सतिश चौधरी (96.20) द्वितीय तर स्वामी अनंत पाटील व निकीता बद्रीप्रसाद चौधरी (95.40) टक्के गुण मिळवून तृतीय आले आहेत.
सोहम भाळेचे सुयश
सेंट लॉरेन्स हायस्कुल मधील विद्यार्थी सोहम योगेश भोळे याने शालांत परिक्षेत 91.80% गुण प्राप्त केले आहे. तर गणित विषयात 99/100 व संस्कृत विषयात 97/100 गुण त्याला मिळाले आहेत. रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष योगेश भोळे यांचा तो सुपुत्र आहे. त्रांच्रा रा रशाबद्दल त्रांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
इकरा शाहीनचा निकाल 90.78 टक्के
इकरा शिक्षण संस्था संचलित इकरा शाहीन उर्दु हायस्कुलचा चा निकाल 90.87 टक्के लागला असुन 152 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 138 विद्यार्थी पास झाले. शेख तुबा सहर जावेद 92.40 टक्के मिळवून प्रथम आला आहे. शेख शायमा मरयम मो.उस्मान व्दितीय (91.20) तर शेख शारमीन सबा आसिफ 89.80 टक्के, व शेख आयशा सिद्यिका मजहरूद्यीन 89.40 टक्के आणि शेख अलीजा फातेमा मो.जावेद 89.20 टक्के प्राप्त केले आहेत.
अँग्लो उर्दू हायस्कूल
अंजुमन तालिमुल मुस्लेमीन संचिलत मौलाना अब्दुल रज्जाक अँग्लो उर्दू हायस्कूलचा 278 विद्यार्थ्यांपैकी 229 उत्तीर्ण झाल्याने विद्यालयाचा निकाल 82.37% लागला आहे. विद्यालयात सेमी इंग्रजी माध्यमामध्ये काजी नूर फातेमा अज़िमोद्दीन या विद्यार्थींनींने 95% गुण मिळवून सेमी इंग्रजीसह विद्यालयात प्रथम क्रमांक मिळिवला. सै.कैजाद सै. सज्जाद हा विद्यार्थीं 93.20% गुण मिळवून मिळवून दुसर्या स्थानी राहिला. तर तन्जिला अख्तर मिर्झा अताउर्रहेमान ही विद्यार्थींनी 92.80%गुण मिळवून तिसर्या क्रमांकावर राहिली.विद्यालयाच्या उर्दू माध्यमातून शेख मिर्झा रजा महेमूद या विद्यार्थींनींने 83.80%गुण मिळवून पहिला क्रमांक पटकविला. शेख सद्दाम पटेल व अल्फीया बानो मुशीर कुरेशी 82.20%गुण मिळवून दुसर्या स्थानी राहिले. तर सै.हिना कौसर फारूक ही विद्यार्थींनी 80.20 % गुण मिळूवन तिसर्या स्थानी राहिली. विद्यालयात प्रथम तीन क्रमांक मिळविणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार चेअरमन अ. गफ्फार मलिक यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक शेख नईमोद्दीन, उप मुख्याध्यापक डॉ. बाबू शेख, पर्यवेक्षक फारूक अमीर यांच्यासह शिक्षक व पलाक उपस्थित होते.
आदर्श सिंधी हायस्कूलचा निकाल 100 टक्के
आदर्श सिंधी हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. या शाळेतील 46 विद्यार्थ्यांनी दहावींची परीक्षा दिली होती. हे 46 चे 46 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 22 विद्यार्थ्यांना डिस्टीक्शन तर 19 विद्यार्थ्यांना फस्ट क्लास मिळाला आहे. निरज महेश चावला हा 94 टक्के गुण मिळवून विद्यलयातून प्रथम आला आहे. तर प्रेरणा संतोष कुकरेजा 93 टक्के मिळवून व्दितीय तर मुकेश महेश खानचंदानी 91.2 टक्के मिळवून तृतीय आला आहे. राखी मनोहर परपीयानीस 90.6 टक्के तर पुजा राजेश सिंधी हीस 90.4 टक्के गुण मिळाले आहेत.
संजना सुरवाडेचे सुयश
शहरातील अयोध्यानगर येथील बी.यु. एन रायसोनी महाविद्यालयाची दहावीची विद्यार्थिनी संजना सुरेन सुरवाडे हीने 90.20 टक्के गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम तर वर्गात चौथा क्रमांक पटकाविला आहे. संजना हिला मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील यांचे मार्गदर्शन मिळालेे. तिचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. संजना सुरवाडे ही जळगाव खुर्द येथील मुळ रहिवासी असून सध्या अजिंठा हाऊसिंग सोसायटी येथे वास्तव्यास आहे. संजना हिला 500 पैकी 451 गुण मिळाले आहे.