चाळीसगाव । इयत्ता 10 वीच्या परीक्षेत चाळीसगाव येथील तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी सुनील निंबाळकर हिला 95.40 टक्के गुण मिळून ती उत्तीर्ण झाली आहे. वर्ग शिक्षिका श्रीमती दर्पे व मुख्याध्यपक विचूरकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तर राष्ट्रीय कन्या शाळेची विद्यार्थिनी योगिनी विजय दुबे हिला 88.10 टक्के मार्क मिळाले असून की तुकडीत ती उत्तीर्ण झाली असून तिला मुख्याध्यापिका भारती पाटील व वर्ग शिक्षिका अनिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांचे रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, पत्रकार मुराद पटेल, सूर्यकांत कदम, विजय गायकवाड, दिलीप घोरपडे, शुभम पवार, रवींद्र सूर्यवंशी, पप्पू पाटील, प्रमोद वाघ, पी.एन.पाटील, दीपक राजपूत, नगरसेवक भगवान पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.