पिंपरी-चिंचवड : भोसरी येथील दहावीची मुलगी बोर्डाच्या पेपरसाठी शाळेत गेली असताना एक अज्ञात इसमाने तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. आरोपी अज्ञात असून ही घटना मार्च ते एप्रिल दरम्यान घडली असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.
पीडित मुलगी उर्दूच्या पेपर संपवून परतत असताना शाळेच्या आवारातच एक अज्ञात इसमाने तिच्यावर जबरदस्ती केली.मुलीने घाबरून घरी सांगितले नाही मात्र आता ती गरोदर राहिल्या नंतर सारा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र या प्रकरणात पीडित मुलीनेही आरोपी व घटनेबद्दल स्पष्ट माहिती दिलेली नाही. भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.