सिंधुदुर्ग – दहावीत शिकत असलेल्या रितेश विलास म्हाडेसर (वय-16) या शाळकरी मुलाने आत्महत्या केल्याने विद्यार्थी दशेतील मुलामच्या आत्महत्येचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. सावंतवाडी शहरालगत असलेल्या चराठे -वझरवाडी येथे राहणारा रितेश हा दहावीत कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होता. त्याची घरची परिस्थिती गरीब असून त्याच्या वडिलांचे 4 वर्षापूर्वी निधन झाले. आई घरकाम करुन 2 मुलांना सांभाळत होती. त्याचा लहान भाऊ पाचवीत आहे. अभ्यासाच्या कारणावरून आई ओरडल्याने रितेशने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी भेट दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.