जामनेर । शहरापासून जवळच असलेल्या टहाकळी गावातील शिक्षण घेत असलेल्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडल्याचे समजते. शहराच्या अगदी जवळच असलेल्या टहाकळी गावात राहणार्या गौतमा ज्ञानेश्वर नरवाडे (वय-17) या युवतीने गळफास घेत आत्महत्या केली. ती दहावीपर्यंत शिक्षण घेत होती. व तिचे दहावी बोर्डाची पेपर चालू होते. मयत गौतमा हिने गळफास घेऊन आत्महत्या का केली. याचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. याबाबतीत उशीरापर्यंत पोलिस स्टेशनला घटने विषयी कोणतीही नोंद झाली नसल्याचे कळते.